‘आ रहा हूं, सवाल… ‘, सुप्रीम कोर्टातून राहुल गांधी यांना दिलासा मिळताच काँग्रेस गर्जली, दिला इशारा
VIDEO | सुप्रीम कोर्टातून राहुल गांधी यांना दिलासा मिळताच ट्विट करत काँग्रेसने सरकारला घेरलं अन् काय दिला इशारा?
नवी दिल्ली, ४ ऑगस्ट २०२३ | सर्वोच्च न्यायालयाकडून मोदी आडनाव प्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना शुक्रवारी मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने राहुल गांधींना सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. न्यायालयाने दिलेल्या मोठ्या दिलासानंतर आता राहुल गांधी यांना काँग्रेसच्या खासदारीला देखील उभं राहता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे काँग्रेसने स्वागत केले आहे. पक्षाने याला द्वेषावर प्रेमाचा विजय म्हटले आहे. यासोबतच उद्योगपती गौतम अदानी यांना घेराव घालत संसदेत राहुल गांधींच्या भाषणाचे पोस्टरही ट्विट करण्यात आले आहे. ट्विटमध्ये लिहिले आहे, ‘आ रहा हूं…सवाल जारी रहेंगे. राहुल यांना दिलासा मिळाल्यानंतर सत्यमेव जयते म्हणत लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी असे म्हटले की, राहुल गांधी यांच्या विरोधात एक घृणास्पद षडयंत्र रचण्यात आले होते, जे आज सिद्ध झाले आहे की, हे कट फसले आहे.