रविकांत तुपकर यांच्या आई भडकल्या अन् म्हणाल्या ‘… हे सरकारला कधीच पचणार नाही’
कापूस आणि सोयाबीनला चांगला भाव मिळावा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेलं आंदोलन वेगळ्याच वळणावर
बुलढाणा: कापूस आणि सोयाबीनला चांगला भाव मिळावा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेलं आंदोलन वेगळ्याच वळणावर जाऊन पोहोचले आहे. आंदोलन चांगलंच पेटल्यानंतर स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानंतर तुपकर भूमिगत झाले होते. दरम्यान, पोलिसांच्या वेशात आलेल्या तुपकर यांनी आंदोलनात येऊन अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. आंदोलनात सहभागी झालेल्या आई आणि पत्नीसमोरच तुपकर यांनी हे कृत्य केलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळळा. दरम्यान, रविकांत तुपकर यांच्या आंदोलनानंतर त्यांच्या आई गिताबाई तुपकर यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरत कठोर शब्दांत कान टोचले तर मुलाच्या आंदोलनाला पांठिबा दर्शविला आहे.
Published on: Feb 11, 2023 03:09 PM
Latest Videos