संभाजी भिडे यांच्या वक्तव्याणं तणाव वाढला; यवतमाळमध्ये आंबेडकरवादी संघटना आक्रमक

संभाजी भिडे यांच्या वक्तव्याणं तणाव वाढला; यवतमाळमध्ये आंबेडकरवादी संघटना आक्रमक

| Updated on: Jul 29, 2023 | 12:10 PM

त्या वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक झाली असून पुणे, आमरावती आणि कोल्हापूरात आंदोलने केली जात आहेत. तर काँग्रेस नेत्या ॲड. आमदार यशोमती ठाकूर यांनी भिडे यांच्यावर टीकेची झोड उढवली आहे. तसेच भिडे यांना महाराष्ट्रातूनच नाही तर देशातून हद्दपार केलं पाहिजे असं म्हटलं आहे.

आमरावती, 29 जुलै 2023 | शिवप्रतिष्ठानचे हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल अक्षेपाहार्य वक्तव्य केल्यानं राज्यात वातावरण चिघळलं आहे. त्यांच्या त्या वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक झाली असून पुणे, आमरावती आणि कोल्हापूरात आंदोलने केली जात आहेत. तर काँग्रेस नेत्या ॲड. आमदार यशोमती ठाकूर यांनी भिडे यांच्यावर टीकेची झोड उढवली आहे. तसेच भिडे यांना महाराष्ट्रातूनच नाही तर देशातून हद्दपार केलं पाहिजे असं म्हटलं आहे. तर आज यवतमाळमध्ये संभाजी भिडेचे व्याख्यान आयोजित केलं आहे. मात्र त्याच्याआधी भिडेच्या दौऱ्याला आंबेडकरवादी संघटनांनी आक्रमक भमिका घेत विरोध केला आहे. तर वंचित आणि जनआक्रोश मार्चाकडून भिडे यांचं हे व्याख्यान उधळून टाकण्याचा इशारा दिला आहे. तर या वादावरून भिडे यांना पोलिस संरक्षण देण्यात आलं आहे. तर सभेस्थळी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Published on: Jul 29, 2023 12:10 PM