काँग्रेसनं सत्यजित तांबे यांना डिवचलं, असे का म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
सत्यजित तांबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या आरोपांनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं भाष्य, म्हणाले...
नागपूर : नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा दणदणीत विजय झाला आहे. दरम्यान सत्यजित तांबे यांनी त्यांच्याच पक्ष श्रेष्ठीवर गंभीर आरोप केल्याचे पाहायला मिळाले. सत्यजित तांबे यांनी केलेल्या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खदखद निर्माण झाली आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, सत्यजित तांबे यांच्यासोबत ज्या पद्धतीने व्यवहार झाला तो त्यांनी बोलून दाखवला आहे. त्यांच्यावर झालेली आपबीती त्यांनी सांगितले. तर एक युवा आणि प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून भाजपकडून तांबे यांना स्थानिक पातळीवर पाठिंबा देण्यात आला. मविआ दुसरा उमेदवार दिला. मात्र कोणत्या पक्षात जायचे नाही हा सत्यजित तांबे यांचा निर्णय आहे. परंतु या सगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसने सत्यजित तांबे यांना डिवचल्याचे दिसून आले आहे.