काल ‘साहेबांशिवाय पर्याय नाही’, तर आज ‘साहेब…’; राजीनामा मागे अन् पुन्हा कार्यकर्त्यांची बॅनरबाजी
VIDEO | शरद पवार यांनी आपला राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतल्यानंतर ठाण्यात झळकले बॅनर, कार्यकर्त्यांनी मानले आभार
ठाणे : शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीच्या पक्षातच अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र समितीच्या निर्णयानंतर शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. शरद पवार यांच्या राजीनामा मागे घेण्याच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. अशातच ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून बॅनर्स लावण्यात आले. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यानंतर ठाण्यात शरद पवार साहेबांशिवाय पर्याय नाही, असे बॅनर्स लावण्यात आल्याचे पाहायला मिळाले होते. तर आज ठाण्यातच शरद पवार पुन्हा मैदानात अशा आशयाचे बॅनर्स लावत कार्यकर्त्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. ठाण्यात हे बॅनर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि ठाणे जिल्हा समन्वयक आनंद परांजपे यांच्या वतीने लावण्यात आले आहेत. राहुल गांधी, ममता बॅनर्जी ,अरविंद केजरीवाल यांच्यासह इतर बड्या नेत्यांचे फोटो या बॅनरवर दिसत असून राष्ट्रवादी पक्षाकडून आणि कार्यकर्त्याकडून आभार व्यक्त करण्यात आले आहे.