मुख्यमंत्री शिंदे यांनी शरद पवार यांचा तो किस्सा सांगत म्हणाले, ‘शेवटी जिवाभावाची माणसं…’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका होताना दिसते. मात्र काल मुंबई सेंट्रल येथील मराठा मंदिर संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमात वेगळंच चित्र पहायला मिळालं त्यामुळे उपस्थितांसह राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या.
मुंबई : सध्या राज्याचं राजकारण हे महाविकास आघाडी आणि शिवसेना-भाजप युतीतून विस्तव ही जात नाही अस झालं आहे. येथे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका होताना दिसते. मात्र काल मुंबई सेंट्रल येथील मराठा मंदिर संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमात वेगळंच चित्र पहायला मिळालं त्यामुळे उपस्थितांसह राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. याकार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री शिंदे, मंत्री उदय सामंत उपस्थित होते. ज्यात पवार यांनी शिंदे यांचे तर शिंदे यांनी पवार यांचे तोंडभरून कौतूक केलं. यावेळी शिंदे यांनी ठाण्यातील एक किस्सी सांगताना, पवार यांची आठवण सांगितली. तसेच त्यांनी बोलल्यानंतर कटूता दूर होते. राजकारणाचा आखाडा व्हायला वेळ लागत नाही असं देखील शिंदे म्हणाले. तर बोलल्यानंतर कटूता राहत नसते, मार्ग निघत असतो. शेवटी निवडणुका या राजकारणापुरत्या असतात. कायमच राजकीय आखाडे आपण तयार केलेच पाहिजेत अशी आवश्यकता नाही असंही शिंदे म्हणाले. Maharashtra Politics