मोठ्या बंधूनंतर वहिनीही अजितदादांविरोधात प्रचार करण्यास मैदानात, काय केला हल्लाबोल?

मोठ्या बंधूनंतर वहिनीही अजितदादांविरोधात प्रचार करण्यास मैदानात, काय केला हल्लाबोल?

| Updated on: Mar 26, 2024 | 12:39 PM

शर्मिला पवार यासुद्धा अजित पवार यांच्याविरोधात प्रचार करण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत. इंदापूर येथे त्यांनी केलेले भाष्य चांगलेच चर्चेत आलं आहे. इंदापूरमध्ये रूपाली चाकणकर यांनी केलेल्या वक्तव्याला शर्मिला पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

श्रीनिवास पवार यांच्यानंतर त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यासुद्धा अजित पवार यांच्याविरोधात प्रचार करण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत. इंदापूर येथे त्यांनी केलेले भाष्य चांगलेच चर्चेत आलं आहे. इंदापूरमध्ये रूपाली चाकणकर यांनी केलेल्या वक्तव्याला शर्मिला पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. भाजपच्या राजकारणावरून टीका करताना त्यांनी केलेल्या आरोपांवरही शर्मिला पवार यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. आधी आत्या, सख्खे बंधू, पुतणे आणि आता वहिनी देखील विविध मुद्द्यांवरून अजित पवार यांना घेरतांना दिसताय. अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला आहे. श्रीनिवास पवार यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी तर अख्खा इंदापूर पिंजून काढत सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी शर्मिला पवार यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीकाही केली.

Published on: Mar 26, 2024 12:39 PM