T20 World Cup 2024 : दक्षिण आफ्रिकेला लोळवणाऱ्या टीम इंडियाला वादळानं रोखलं; बार्बाडोसमध्येच अडकले, कधी परतणार मायदेशी?

T20 World Cup 2024 : दक्षिण आफ्रिकेला लोळवणाऱ्या टीम इंडियाला वादळानं रोखलं; बार्बाडोसमध्येच अडकले, कधी परतणार मायदेशी?

| Updated on: Jul 02, 2024 | 1:38 PM

T20 वर्ल्डकपच्या अतिरोमांचक अंतिम सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी धुळ चारत भारतीय संघाने वर्ल्डकप जिंकला. दरम्यान, वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशी परतण्यासाठी आतुर असलेल्या टीमचा मार्ग बार्बाडोसमधील वादळाने रोखून धरला... पण कधी परतणार मायदेशी?

भारतीय संघाने T20 वर्ल्डकप सामन्यात दणदणीत विजय मिळवला. भारतीय संघाने शनिवारी बार्बाडोसमध्ये इतिहास रचला. T20 वर्ल्डकपच्या अतिरोमांचक अंतिम सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी धुळ चारत भारतीय संघाने वर्ल्डकप जिंकला. भारतीय संघाने वर्ल्डकप जिंकण्याची ही दुसरी वेळ असून तब्बल 17 वर्षांनंतर वर्ल्डकप भारताचं नाव कोरलं गेलंय. दरम्यान, वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशी परतण्यासाठी आतुर असलेल्या टीमचा मार्ग बार्बाडोसमधील वादळाने रोखून धरला असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. वर्ल्डकप जिंकल्यानंतरही भारतीय संघ अघ्याप बार्बाडोसमध्ये अडकल्याची माहिती आहे. बार्बाडोसमध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे भारतीय संघ आपल्या मायदेशी परतू शकत नाही. कारण आलेल्या चक्रीवादळामुळे बार्बाडोस प्रशासनाने कर्फ्यू लावला आहे. दरम्यान, हा कर्फ्यू लावल्याने सर्व विमानांचे उड्डाणं रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हरिकेन बेरिल हे वादळ बार्बाडोसला धडकलं. हे कॅटेगरी 4 च वादळ होतं. या वादळामुळे टीम इंडियाला सुद्धा अडचणींचा सामना करावा लागला आहे. बार्बाडोसच्या लोकल टाइमनुसार, मंगळवारी संध्याकाळी 6.30 वाजता संपूर्ण टीम भारतात येण्यासाठी रवाना होईल. बुधवारी रात्री 7.45 वाजेपर्यंत टीम इंडिया दिल्लीमध्ये दाखल होणार आहे.

Published on: Jul 02, 2024 01:37 PM