Latur | मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भागवत कराडांच्या मूळगावी गावकऱ्यांचा जल्लोष
भाजप नेते डॉ. भागवत कराड यांना केंद्रात अर्थराज्य मंत्रीपद मिळालं आहे. कराड यांना मंत्रिपद मिळणार अशी चर्चाही नव्हती. मात्र काल अचानक त्यांचे नाव मंत्रिपदासाठी पुढे आले आणि कराड चर्चेत आले. आपल्याला मंत्रिपद कसं मिळालं? काल नेमकं काय घडलं यावर स्वत: भागवत कराड यांनीच प्रकाश टाकला आहे.

भागवत कराड यांनी आज मंत्रिपदाचा पदभार स्विकारला. त्यानंतर मीडियासोबत संवाद साधला. मी मंत्री होणार याची मला कोणत्याही प्रकारची कल्पना नव्हती. मला कोणत्याही ऑफिसमधून फोन आला नव्हता. पण शपथविधीच्या दिवशी मला फोन आला आणि मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी तयार राहा असं सांगितलं. त्यानंतर मी मोदींची भेट घेतली आणि संध्याकाळी माझा शपथविधी पार पडला, असं भागवत कराड यांनी सांगितलं.
Latest Videos