अजित पवार यांच्या बंडाच्या बातम्यांनंतर शरद पवार सावध, राष्ट्रवादीच्या प्रत्येक आमदाराला केला फोन अन्…
VIDEO | अजित पवार बंड करणार? पक्ष फुटीच्या चर्चा रंगल्यानंतर शरद पवार यांची सावध भूमिका
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बंडाच्या बातम्या पसरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सावध झाले आहेत. पक्ष फुटीची चर्चा रंगल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी सावध भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन या बातम्यांवर स्पष्टीकरण देत चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय. पण तरीही शरद पवार सतर्क झालेत. कारण गेल्या दोन दिवसांत काही आमदारांनी उघडपणे अजित पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे तशी संभाव्य राजकीय घडामोड घडू शकते का? याची तपासणी आता शरद पवारांनी सुरु केली आहे. पक्ष फुटीच्या रंगलेल्या चर्चा आणि आमदारांचं त्याबाबत असलेले मत जाणून घेण्याचं काम शरद पवार आता करत आहे. अजित पवार खरंच तसा काही निर्णय घेतील तर पुढे रणनीती काय आखायची याबाबतची शरद पवार विचार करु शकतात, असेच यावरून दिसतेय.