‘तर विनायक राऊत तुम्ही तोंडावर आपटाल’, ‘त्या’ आव्हानानंतर राणे समर्थक आक्रमक
VIDEO | ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आव्हान दिल्यानंतर राणे समर्थक आक्रमक
सिंधुदुर्ग : रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरीवरून आता उद्धव ठाकरे गट विरुद्ध राणे समर्थक असा सामना रंगताना पहायला मिळतोय. खासदार विनायक राऊत यांनी राणे यांना आव्हान दिल्यानंतर आता राणे समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांची शिल्लक सेना यांच्यात हिंमत असेल तर नारायण राणे यांना अडवून दाखवावं असं आव्हान दिलंय. त्यामुळे उद्धव ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. दरम्यान, आज निलेश राणे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधल्याचे पाहायला मिळत आहे. ६ तारखेला आम्ही रिफायनरीच्या समर्थनात मोर्चा काढणार त्या तयारीसाठी आज ४ वाजता आम्ही रत्नागिरीत पोहोचतोय, असे निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटले आहे. तर कोकणाला विस्कटलेलाच ठेवायचा हा उद्धव ठाकरे यांचा मनसुबा आहे. आम्ही तो मनसुबा येत्या ६ तारखेला हाणून पाडणार, असा इशारा निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. यासह तुम्ही संपूर्ण ताकद लावा, भेटूया ६ तारखेला असेदेखील ट्विटमध्ये म्हटले आहे.