Sharad Pawar Resigns | शरद पवार निवृत्तीवर ठाम, मात्र दिनक्रम कायम अन् भेटीगाठी सुरूच
VIDEO | निवृत्तीच्या घोषणेनंतर शरद पवार वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये दाखल, पवार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह भेटगाठी घेणार
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल आपला राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त (Sharad Pawar Resigns) होत असल्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. शरद पवारांच्या या घोषणेनंतर शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून सातत्याने पदाधिकारी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून विनंती केली जात आहे. मात्र शरद पवार आपल्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या निवृत्तीवर कायम आहे. मात्र शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली असली तरी त्यांचा रोजचा दिनक्रम हा कायम असल्याचे दिसतेय. राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर शरद पवार वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांच्या भेटीगाठी कायम आहे. तर आज शरद पवार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. यावेळी शरद पवार यांच्या सोबत सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित आहेत. शरद पवार यांच्या आज सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये भेटगाठीचा कार्यक्रम ठरलेला आहे.