Mumbai Ganeshotsav | गणेशोत्सव संपताच मुंबईत चिकन आणि अंड्यांचे भाव वधारले
श्रावण महिन्यातील उपवास आणि गणेशोत्सवाचा काळ संपताच चिकन आणि अंड्यांचे भाव वधारले. सोयाबीन आणि मका महागल्याने मासांहार सेवनाकडे वळल्याने गेल्या दोन ते तीन दिवसांत कोंबडी तसेच अंड्यांच्या दरात वाढ झाली आहे.
श्रावण महिन्यातील उपवास आणि गणेशोत्सवाचा काळ संपताच चिकन आणि अंड्यांचे भाव वधारले. सोयाबीन आणि मका महागल्याने मासांहार सेवनाकडे वळल्याने गेल्या दोन ते तीन दिवसांत कोंबडी तसेच अंड्यांच्या दरात वाढ झाली आहे. ब्रॉयलर आणि गावठी कोंबडीच्या दरात प्रति किलोमागे दहा रुपयांनी तर, अंड्याच्या दरात प्रति नग १ रुपयाने वाढ झाली आहे. ब्रॉयलर कोंबडी आधी 120 रुपये प्रति किलोने, गावठी कोंबडी 430 रुपये प्रति किलोने आणि अंडी प्रति नग पाच रुपये दराने विक्री केले जात होते.
आता ब्रॉयलर कोंबडी 140 ते 150 रुपये प्रति किलोने, गावठी कोंबडी 440 ते 460 रुपये प्रति किलोने तसेच अंडी प्रति नग सहा रुपये दराने विक्री केले जात आहेत.
Latest Videos