किरीट सोमय्या अडचणीत? आक्षेपार्ह व्हिडिओ झाला व्हायरल; सोमय्या यांची फडणवीस यांच्याकडे धाव; केली चौकशी मागणी

किरीट सोमय्या अडचणीत? आक्षेपार्ह व्हिडिओ झाला व्हायरल; सोमय्या यांची फडणवीस यांच्याकडे धाव; केली चौकशी मागणी

| Updated on: Jul 18, 2023 | 3:36 PM

सोमय्या यांनी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांविरोधात ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाकडे भ्रष्टाचाराचे आरोप करत तक्रार केल्या होत्या. मात्र आता तेच सोमय्या राजकीयदृष्ट्या अडचणीत आले आहेत.

मुंबई, 18 जुलै 2023 | भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. सोमय्या यांनी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांविरोधात ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाकडे भ्रष्टाचाराचे आरोप करत तक्रार केल्या होत्या. मात्र आता तेच सोमय्या राजकीयदृष्ट्या अडचणीत आले आहेत. सोमय्यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला असून एका वृत्तवाहिनेने तो प्रसारित केला आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असून राजकारण तापले आहे. यानंतर सोमय्या यांनी याप्रकरणी आपली भूमिका मांडताना, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. तसेच यावरून त्यांनी, मी कोणत्याही महिलेचे शोषण केले नाही. माझ्यावर आरोप केले जात आहेत. याप्रकरणाची सत्यता तपासली पाहिजे अशी मागणी केली आहे.

Published on: Jul 18, 2023 12:37 PM