राजीनाम्यानंतर वसंत मोरेंना राज ठाकरेंचा फोन; पण बोलणं टाळलं, कारण…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना संपर्क साधला की नाही? असा सवाल वसंत मोरे यांना केला असता त्यांनी राज ठाकरे यांचा फोन आला होता असे म्हटले पण मी बोललो नाही, कारण....
पुणे, १३ मार्च २०२४ : वसंत मोरे यांनी मनसे या पक्षातून राजीनामा दिल्यानंतर यावर कुणी भाष्य करायचे नाही असे आदेश पक्षाकडून देण्यात आले होते. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना संपर्क साधला की नाही? असा सवाल वसंत मोरे यांना केला असता त्यांनी राज ठाकरे यांचा फोन आला होता असे म्हटले पण मी बोललो नाही, असे सांगितले. वसंत मोरे म्हणाले, पक्ष सोडल्यानंतर पक्षाच्या एका नेत्याकडे आला होता. मी त्यांना विनंती केली, कृपया मला फोन देऊ नका. मी त्यांना फसवू शकत नाही. आयुष्यात कधी त्यांना फसवले नाही. आता मला माघारी परतायचे नाही. मला आग्रह करु नका. साहेबांसोबत बोलायला लावू नका. मला बोलायला जमणार नाही. मला बोलायला जड होईल. कारण परवा माझी शुगर खूप वाढली होती. माझे काही बरे वाईट झाले तर कोणासाठी करायचं एवढं सगळं आहे, असं म्हणत असताना वसंत मोरेंना पुन्हा गहिवरून आले.