आयोगाच्या निकालापूर्वी शिंदे गटातील खासदाराचा दावा, पक्ष आणि चिन्ह आम्हालाच

आयोगाच्या निकालापूर्वी शिंदे गटातील खासदाराचा दावा, पक्ष आणि चिन्ह आम्हालाच

| Updated on: Jan 17, 2023 | 3:27 PM

“आजच्या सुनावणीनंतर धनुष्यबाण आम्हालाच मिळणार, धनुष्यबाण मिळाल्यानंतर ठाकरे गटाकडे चार आमदारंही शिल्लक राहणार नाही, ठाकरे गटाचे नेते आमच्याकडे येण्यासाठी रांग लावतील.”

शिंदे गट की ठाकरे गट, धणुष्यबाण कुणाला? यावर आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी आहे. “आजच्या सुनावणीनंतर धनुष्यबाण आम्हालाच मिळणार, धनुष्यबाण मिळाल्यानंतर ठाकरे गटाकडे चार आमदारंही शिल्लक राहणार नाही, ठाकरे गटाचे नेते आमच्याकडे येण्यासाठी रांग लावतील.” असा दावा शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे.

नागपूरमध्ये शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी रांग लागली आहे, आम्ही आता कार्यकारणी थांबवली आहे. कारण शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांना माहित आहे, धनुष्यबाण हा शिंदे गटालाच मिळणार आहे. ४० आमदार आणि १३ खासदार आमच्याकडे आहे, त्यामुळे आमच्याकडे जास्त जनमत आहे. यावरुन आम्हालाच धनुष्यबाण मिळणार, असेही कृपाल तुमाने यांनी म्हटले आहे.

Published on: Jan 17, 2023 03:25 PM