‘शाळिग्राम नावाच्या माकडाने दिवसापण गांजा…’; मिटकरींची तुषार भोसलेंवर खोचक टीका
सावित्रीबाई फुले ऐवजी सावित्रीबाई होळकर असा उल्लेख अजित पवार यांनी केला आहे. त्यावर तुषार भोसले यांनी अजित पवारांवर टीका केली. तसेच माफी मागावी, अशी मागणी भोसले यांनी केली. यानंतर अमोल मिटकरी यांनी एक व्हिडीओ जारी करत भोसले यांच्यावर खोचक टीका केली आहे.
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापलं. त्यानंतर पुन्हा एदका त्यांनी अशीच चुक सावित्रीबाई फुलेंच्या बाबत करत टीका ओढावून घेतली आहे. यावर आता भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे
अजित पवारांनी सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा चुकीचा उल्लेख केला आहे. त्यांनी बोलण्याच्या ओघात सावित्रीबाई फुले ऐवजी सावित्रीबाई होळकर असा उल्लेख केला आहे. ते पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावर तुषार भोसले यांनी अजित पवारांवर टीका केली. तसेच माफी मागावी, अशी मागणी भोसले यांनी केली.
तुषार भोसले यांच्या मागणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी एक व्हिडीओ जारी करत भोसले यांच्यावर खोचक टीका केली आहे. यावेळी मिटकरी म्हणाले, “शाळिग्राम नावाच्या माकडाने दिवसापण गांजा ओढायला सुरुवात केली आहे, असं दिसतंय. खरंतर हा व्यक्ती कोणत्या पंथाचा आहे? हे आम्ही लवकरच उघडं पाडणार आहोत. दुसरं म्हणजे याला कोणताही धंदा नसल्याने तो फक्त आणि फक्त अजित पवारांवर टीका करण्याचा प्रयत्न करतो.