घालीन लोटांगण… अज्ञातांची पुन्हा बॅनरबाजी, उद्धव ठाकरेंना नेमकं कोणी डिवचलं?
काल ठाण्यात ठाकरे विरुद्ध शिंदे गट यांच्यात बॅनरबाजी वॉर दिसून आले. तर दुसरीकडे मनसे विरुद्ध ठाकरे गट असा राडा रात्रभर दिसून आला. काल मनसेने सुपारीचे उत्तर नारळ आणि शेणाने दिल्याचे पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे यांची सभा ठाण्यात होती यावेळी ठाकरेंच्या ताफ्यावर नारळ शेण, टोमॅटो आशांचा हल्ला करून मनसैनिकांनी राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपारी फेकण्यात आलेल्या कृतीचा पलटवार केला आहे.
ठाणे शहरात पुन्हा एकदा आज्ञातांकडून व्यंगचित्राचे बॅनर लावण्यात आले आहे. काल ठाकरे गटाच्या विरोधात करण्यात आलेले बॅनर पुन्हा ठाण्यात झळकल्याचे पाहायला मिळत आहे. आज्ञातांकडून ठाण्यात करण्यात आलेल्या बॅनरबाजीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाकडून ठाण्यात बॅनरबाजी करण्यात आली होती. या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा फोटो होता. त्यासोबतच यावर लिहिलेल्या मजकुराने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. “पक्ष कोणी चोरला, दुसऱ्याची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व नाही, काय आहे हिंदुत्व?” असा आशय या बॅनरवर पाहायला मिळाले होते. आता उद्धव ठाकरेंविरोधात अज्ञातांनी पुन्हा बॅनरबाजी केली आहे. अज्ञातांनी लावलेल्या बॅनरवर घालीन लोटांगण, वंदीन चरण… असं लिहिलं असून दिल्लीकडे म्हणजे शरद पवार, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना उद्धव ठाकरे लोटांगण घालता आहे आणि त्यांच्या मागे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे उभे दाखवले आहे.