Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी उच्चशिक्षित तरूणांनी स्वतःला जमिनीत अर्धे गाडले अन्...

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी उच्चशिक्षित तरूणांनी स्वतःला जमिनीत अर्धे गाडले अन्…

| Updated on: Oct 29, 2023 | 3:33 PM

VIDIEO | धाराशिवसमधील मेडसींगा या गावात जवळपास 20 उच्च शिक्षित मराठा तरुणांनी स्वतःला कंबरेपर्यंत जमिनीत गाढून घेतले आहे. मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी या मराठा तरुणांनी कंबरेपर्यंत स्वतःला जमिनीत गाडून घेतले आहे.

धाराशिव, २९ ऑक्टोबर २०२३ | मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. गेल्या पाच दिवसांपासून सरकारकडून चर्चेला कोणी आले नसल्याने मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. तर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आता खालवत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी धाराशिव जिल्ह्यातील मेडसींगा या गावात मराठा तरुण आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. धाराशिवसमधील मेडसींगा या गावात जवळपास 20 उच्च शिक्षित मराठा तरुणांनी स्वतःला जमिनीत गाढून घेतले आहे. मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी या मराठा तरुणांनी कंबरेपर्यंत स्वतःला जमिनीत गाडून घेतले आहे. मराठा आरक्षण द्यावे अशी मागणी करत सरकार विरोधी घोषणाबाजी या तरूणांकडून केली जात आहे. यावेळी या गावातील संपूर्ण तरूण वर्ग हा गाडून घेतलेल्या तरुणांच्या समर्थनार्थ मैदानात हातात भगवे झेंडे हातात घेऊन रस्त्यावर उतरले आहेत.

Published on: Oct 29, 2023 03:33 PM