Maratha Reservation : आरक्षणाच्या मुदद्यावरून मराठा संघटना आक्रमक, सोलापुरात थेट रेलरोको
राज्यात ठिकठिकाणी रस्ते, महामार्ग अडवले जात आहे. रस्ते आणि मोठ्या महामार्गावर टायरची जाळपोळ करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. सोलापूरमध्ये आज विविध प्रकारची आंदोलनं करण्यात आलीत. त्यामध्ये मराठा क्रांती मोर्च्याच्या आंदोलकांनी रेल रोको आंदोलन करून रेल्वे अडवण्याचा प्रयत्न केला.
सोलापूर, ३१ ऑक्टोबर २०२३ | राज्यातील वातावरण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलंच पेटताना दिसतंय. अशातच सोलापूर येथे मराठा समाजातील आक्रमक आंदोलकांनी रेलरोको केलाय. राज्यात ठिकठिकाणी रस्ते, महामार्ग अडवले जात आहे. रस्ते आणि मोठ्या महामार्गावर टायरची जाळपोळ करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. सोलापूरमध्ये आज विविध प्रकारची आंदोलनं करण्यात आलीत. त्यामध्ये मराठा क्रांती मोर्च्याच्या आंदोलकांनी रेल रोको आंदोलन करून रेल्वे अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी घोषणाबाजी करत आंदोलकांनी रेल्वे रूळावर टायर पेटवले. यावेळी पोलिसांनी देखील कार्यकर्त्यांना रोखले मात्र तरीही आंदोलक मागे हटण्यास तयार नव्हते. पुण्याच्या दिशेने ही ट्रेन सोलापूरच्या दिशेने धावत असताना आंदोलकांनी या ट्रेन समोर एकच गलका करत रेल्वे अडवण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले.
Published on: Oct 31, 2023 07:33 PM
Latest Videos