Bangladesh Crisis : बांगलादेशात हिंसाचार अन् तख्तापलट, दंगलखोरांचा हैदोस; दगडफेकीसह जाळपोळ सुरूच

Bangladesh Crisis : बांगलादेशात हिंसाचार अन् तख्तापलट, दंगलखोरांचा हैदोस; दगडफेकीसह जाळपोळ सुरूच

| Updated on: Aug 07, 2024 | 11:02 AM

बांगलादेशच्या ढाकामधील अवामी लीगच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला आहे. आंदोलकांकडून अवामी लीगचे कार्यकर्त्यांना लक्ष करण्यात आलं होतं.. या हल्ल्यात अवामी लीगचे कार्यकर्ते हे जखमी झाले आहेत.. आंदोलनकर्त्यांकडून अवामी लीगच्या ऑफीसला आग लावण्यात लावली होती. यावेळी हजारोंचा जमाव या ठिकाणी जमला होता.

पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात सुरू झालेल्या आंदोलनामुळे बांगलादेशात अराजकता निर्माण झाली आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून बांगलादेशात हिंसाचाराची ठणगी पडली. कुठे जाळपोळ केली जात आहे तर कुठे हिंदूंच्या वस्तीवर निशाणा साधला जातोय. बांगलादेशातील झबीर इंटरनॅशनल हॉटेलला आंदोलनकर्त्यांनी आग लावली. आगीत २४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यानतंर इंदिरा गांधी कल्चरल सेंटरची जाळपोळ, हिंदू समाजाच्या वस्तीवर आंदोलककर्त्यांनी दगडफेक आणि जाळपोळ केली तो व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. आजही हिंसाचाराच्या घटना सुरूच आहेत. सर्वाधिक जाळपोळ ही ढाका येथे होत असून आंदोलकांचा हैदोस हा सुरूच आहे. तर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेलेल्या जवानांना आवामी लीगच्या खासदाराच्या घरात पाच कोटी रूपये मिळाले. दुसरीकडे दंगलखोरांनी महागडे कपडे, भाजीपाला देखील लुटल्याचे पाहायला मिळाले.. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट.

Published on: Aug 07, 2024 11:02 AM