संभाजी भिडे यांच्याविरोधात अजित पवार गट देखील रस्त्यावर, आंदोलनकरून केली अटकेची मागणी

संभाजी भिडे यांच्याविरोधात अजित पवार गट देखील रस्त्यावर, आंदोलनकरून केली अटकेची मागणी

| Updated on: Aug 02, 2023 | 8:09 AM

भिडे यांच्याविरोधात राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर संघटनांनी निदर्शने केली. तर आता त्यांच्या त्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट देखील आक्रमक झाला आहे.

नागपूर, 02 ऑगस्ट 2023 | संभाजी भिडे यांनी अमरावतीमधील एका सभेत महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिली. त्यानंतर आता भिडे यांच्याविरोधात राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर संघटनांनी निदर्शने केली. तर आता त्यांच्या त्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट देखील आक्रमक झाला आहे. नागपूरमध्ये अजित पवार गटाकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आंदोलन करताना संभाजी भिडे यांनी महापुरुषांचा अपमान केला त्यांना अटक करा अन्यथा आंदोलन तिव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय. तसेच नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनात भिडे यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.

Published on: Aug 02, 2023 08:09 AM