नागपुरात भाजपाच्या वतीने पटोलेंविरोधात आंदोलन, कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप भाजपाच्या वतीने करण्यात आला होता. आता याविरोधात राज्यातील भाजपाचे नेते चांगलेच आक्रमक झाले असून, नाना पटोले यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येत आहे.
नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप भाजपाच्या वतीने करण्यात आला होता. आता याविरोधात राज्यातील भाजपाचे नेते चांगलेच आक्रमक झाले असून, नाना पटोले यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. आज नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपाच्या संतप्त कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन देखील करण्यात आले.
Latest Videos