‘आदित्य ठाकरे नव्या पुड्या सोडून संभ्रम निर्माण करताय’, या मंत्र्यानं केला हल्लाबोल
VIDEO | ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केलेल्या त्या विधानावर शिवसेनेच्या मंत्र्यानं दिलं जशाच तसं प्रत्युत्तर; म्हणाले...
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) हे अटकेला घाबरले होते. मातोश्रीवर येऊन ते रडत होते. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची विनंती करत होते, असं विधान उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली. त्यांच्या या दाव्यावरून राजकारणात एकच आरोप प्रत्यारोप सुरू आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याला समर्थन दिलं. अशातच शिवसेनेचे नेते आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अब्दुल सत्तार म्हणाले, सत्तेतून बाहेर पडल्यावर यांना आता बोलण्याचा शहाणपणा आला आहे. नवीन पुड्या सोडून संभ्रम निर्माण करताय. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेलं ते वक्तव्य चुकीचं असून असं बोलायला नको होतं. वरिष्ठ कुणी बोललं असत तर ठिक आहे, आदित्य ठाकरे खूप लहान आहेत, त्यांच्या वया इतका एकनाथ शिंदे यांचा राजकीय अनुभव आहे, असे म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.