Balasaheb Thorat | अहमदनगर आग प्रकरण दुर्दैवी असून दोषींवर कारवाई केली जाईल – बाळासाहेब थोरात
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आगीच्या घटनेची सखोल चौकशी केली जाईल असं आश्वासन दिलं आहे. ही घटना दुर्दैवी असून दोषींवर कारवाई केली जाईल. तर मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखाची मदत दिली जाणार असल्याचं थोरात यांनी सांगितलं. आगीमुळे झालेल्या धुरामुळे गुदमरुन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती थोरात यांनी दिली आहे.
अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत 10 कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू झालाय. तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ही आग लागल्यामुळे मोठी खळबळ माजली. या प्रकरणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आगीच्या घटनेची सखोल चौकशी केली जाईल असं आश्वासन दिलं आहे. ही घटना दुर्दैवी असून दोषींवर कारवाई केली जाईल. तर मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखाची मदत दिली जाणार असल्याचं थोरात यांनी सांगितलं. आगीमुळे झालेल्या धुरामुळे गुदमरुन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती थोरात यांनी दिली आहे.
दरम्यान, या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तर आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखाच्या मदतीची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलीय. तर दुर्घटनेची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांकडून घेतली. या दुर्घटनेत 10 रुग्णांचा मृत्यू झाला असून 7 जणांना वाचविण्यात यश आले आहे. या दुर्घटनेची माहिती मी तातडीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दिली. ही अत्यंत दुर्दैवी घटना असून आगीत जीव गमावलेल्या रुग्णांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. मृतांच्या कुटुंबियांना तातडीने प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात येत असून या दुर्घटनेची चौकशी जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात येईल आणि त्याचा अहवाल आठवडाभरात देण्याचे निर्देश दिले असल्याचंही टोपे म्हणाले.