Aheri Assembly Constituency : बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
Aheri Assembly Constituency Result : विदर्भातील अहेरी मतदार संघात बाप विरुद्ध लेक असा घरातील सामना रंगला होता.त्यात अखेर राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा विजय झाला असून त्यांची कन्या भाग्यश्री हीचा पराभव झालेला आहे.
विदर्भातील अहेरी मतदार संघात अजितदादा यांच्या राष्ट्रवादीचे धर्मरावबाबा आत्राम यांची आणि त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांच्यात प्रमुख लढत होती. धर्मरावबाबा यांची कन्या भाग्यश्री हीला राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने तिकीट दिले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात ही निवडणूक रंगली होती. तसेच धर्मरावबाबा आत्राम यांचा पुतण्या राजे अंबरीशराव आत्राम हा देखील निवडणूकीला उभा होता. अहेरी मतदार संघात असा सगळा कौटुंबिक सामना रंगला होता. या निवडणूकीत अखेर राष्ट्रवादी अजितदादा गटाचे धर्मरावबाबा आत्राम यांचा विजय झालेला आहे. या विजया नंतर धर्मरावबाबा आत्राम यांनी आनंदाने नृत्य देखील केले आहे. त्यानंतर त्यांनी प्रतिक्रीया देताना बाप अखेर बाप असतो अशी प्रतिक्रीया दिलेली आहे. यावेळी त्यांची कन्या देखील त्यांच्या सोबत विजयोत्सवात सहभागी झालेली दिसत होती.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा

केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी

बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं

आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
