Car accident video | अहमदनगरमध्ये कार 70 फूट खोल दरीत कोसळली, प्रवाशांचं काय झालं?
पुणे-नाशिक महामार्गावरील माहुली घाटात एक कार तब्बल 70 फूट दरीत कोसळली. (ahmednagar car accident)
अहमदनगर : जिल्ह्यातील संगमनेरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारा एक अपघात घडला आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील माहुली घाटात एक कार तब्बल 70 फूट दरीत कोसळली (car accident). 70 फूच खोल दरीत कोसळल्यामुळे या कारची पूर्ण नासधूस झाली. सुदैवानं या विचित्र अपघातात कोणाचाही मृत्यू झालेला नाही. कारमधील 3 तरुण प्रवासी बालंबाल बचावले आहेत. (Ahmednagar car accident car fall in 70 feet valley)
कार 70 फूट खोल दरीत कोसळली, पाहा व्हिडीओ :
गाडीवरचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात, प्रवासी सुखरुप
हा अपघात माहुली घाटात घडला. यामध्ये अपघातग्रस्त कार तब्बल 70 फूट खोल दरीत कोसळली. यावेळी दरीत कोसळताना तब्बल पाच वेळा उलटल्यामुळे कारची संपूर्ण नासधूस झाली आहे. कारमध्ये बसलेले तीन तरुण प्रवासी हे मूळचे गुजरातचे होते. सुदैवाने हे तिन्ही तरुण बचावले आहेत. गाडीवरचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान अपघात घडल्यानंतर महामार्ग पोलिसांनी अपघातग्रस्तांना तत्काळ मदत केली. त्यांना सुखरुप सुरक्षित ठिकाणी हलवले. माहुली घाटाच्या परिसरात असाच एक अपघात झाला होता.
बटाटे आपल्या चेहऱ्यासाठी किती फायदेशीर आहे माहितीये का?; वाचाhttps://t.co/aj6YjthEff #POTATO | #skincare | #Skin |
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 7, 2021
इतर बातम्या :