दौरा देवेंद्र फडणवीस यांचा अन् चर्चा रोहित पवार यांच्या फ्लेक्सची!
Rohit Pawar : रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. त्यामुळे या पोस्टरची सध्या सर्वत्र चर्चा होतेय. व्हीडिओ...
अहमदनगर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कर्जत जामखेडच्या दौऱ्यावर आहेत. फडणवीस यांच्या दौऱ्याआधी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी स्वागताचे काही पोस्टर लावण्यात आले आहेत. रोहित पवार यांनी लावलेल्या या फ्लेक्सची जोरदार चर्चा झाली. रोहित पवार यांनी लावलेले स्वागताचे हे फ्लेक्स सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सध्या याचीच चर्चा सगळीकडे मोठ्या प्रमाणात शहरात सुरू आहे. महाविकास आघाडीच्या काळात काळात झालेल्या कामांचं आज उद्घाटन होणार असल्याने रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानलेत. महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या आणि बांधून पूर्ण झालेल्या पोलीस निवासस्थानाचे आपण उद्घाटन केल्यामुळे पोलिसांची प्रत्यक्ष राहण्याची सोय झाली याबद्दल आभार, असं या पोस्टरवर लिहिण्यात आले आहेत. त्यामुळे या पोस्टरची सध्या सर्वत्र चर्चा होतेय.
Published on: Mar 11, 2023 11:01 AM
Latest Videos