अहमदनगर ग्रामपंचायतींच्या निकालात कोण मारणार बाजी? 16 ग्रामपंचायती बिनविरोध ,178 ग्रामपंचायतींचा कल कोणाकडे?

अहमदनगर ग्रामपंचायतींच्या निकालात कोण मारणार बाजी? 16 ग्रामपंचायती बिनविरोध ,178 ग्रामपंचायतींचा कल कोणाकडे?

| Updated on: Nov 06, 2023 | 11:43 AM

अहमदनगर जिल्ह्यामध्ये 178 ग्रामपंचायतीच्या काल निवडणुका पार पडल्यात. तर आज मतमोजणी होत आहे. नगर जिल्ह्यात काल 79 टक्के मतदान झाले आहे. अहमदनगर जिल्हयातील 194 पैकी 178 ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला सुरूवात झाली. एकूण 194 ग्रामपंचायत मधून 16 ग्रामपंचायत बिनविरोध

अमरावती, ६ नोव्हेंबर २०२३ | अहमदनगर जिल्ह्यामध्ये 178 ग्रामपंचायतीच्या काल निवडणुका पार पडल्यात. तर आज मतमोजणी होत आहे. नगर जिल्ह्यात काल 79 टक्के मतदान झाले आहे. दरम्यान एकूण 194 ग्रामपंचायत मधून जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायत हे बिनविरोध झाल्यामुळे 178 ग्रामपंचायत साठी 3995 सदस्य उमेदवार तर 610 सरपंच उमेदवार रिंगणात होते आणि त्यामुळे राजकीय नेत्यांसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता आहे. कर्जत जामखेडला आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तसेच आमदार मोनिका राजळे, आमदार निलेश लंके आणि माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची प्रतिष्ठापनाला लागली आहे. तर अहमदनगर जिल्हयातील 194 पैकी 178 ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला सुरूवात झाली. अहमदनगर जिल्हयात विखे , थोरात , तनपुरे, गडाख, पिचड, लहामटे, राम शिंदे, रोहित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून भाजप आणि मविआमध्ये चुरस पहायला मिळतेय.

Published on: Nov 06, 2023 11:41 AM