सरकार कोसळण्याच्या भाकितावर भाजप नेत्यानं संजय राऊतांना ठरवलं ठार वेडं; म्हणाले, 'मेंटली लेव्हल...'

सरकार कोसळण्याच्या भाकितावर भाजप नेत्यानं संजय राऊतांना ठरवलं ठार वेडं; म्हणाले, ‘मेंटली लेव्हल…’

| Updated on: Apr 26, 2023 | 9:46 AM

VIDEO | शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार, संजय राऊत यांच्या सततच्या दाव्यावर भाजप नेत्यानं केलं खोचक भाष्य, काय म्हणाले बघा

अहमदनगर : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून विरोधकांकडून वारंवार सरकार पडणार, सरकार पडणार अशी शक्यता वर्तवली जात असताना पुन्हा एकदा भाजपचे खासदार सुजय विखे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांनी अगदी त्यांची मानसिकता ही मेंटल लेव्हलवरची असल्याची टीका केली आहे. त्यामुळे आता भाजप आणि ठाकरे गट असा वाद रंगणार का अशी चर्चा होताना दिसतेय. येत्या पंधरा दिवसात हे शिंदे-फडणवीस सरकार पडणार, या संदय राऊतांच्या दाव्यावर सुजय विखे पाटील यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘संजय राऊत यांची मानसिकता मेंटली लेव्हल 5 वर होती ती आता 7 वर गेली असल्याचा घणाघात त्यांनी त्यांच्यावर केला आहे. त्यांची मेंटल लेव्हल ही पाचवरून सात वर गेल्यामुळे त्यांना आता लवकरच थेरपीमध्ये अॅडमिट करावे लागेल ‘, असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांना खोचक टोलाही लगावला आहे.

Published on: Apr 26, 2023 09:43 AM