अहमदनगरमधील ‘हे’ शहर राहणार बेमुदत संपावर ! काय आहे कारण?
VIDEO | ... तोपर्यंत अहमदनगरमधील 'हे' शहर राहणार बेमुदत संपावर, सामाजिक कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरात छत्रपती संभाजी महाराज जयंती दिनी दोन गटात दगडफेक झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पोलिसांनी शोध मोहीम राबवून 31 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर दीडशेहून अधिक व्यक्तीच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर शहरातील सीसीटीव्ही तपासून मुख्य आरोपींचा शोध घ्यावा आणि त्यांना अटक करावी या मागणीसाठी शेवगाव शहरातील व्यापाऱ्यांनी बेमुदत बंदचा इशारा दिला आहे. घटनेच्या तिसऱ्या दिवशी आज शेवगाव शहरातील जनजीवन पूर्वपदावर येत असलं तरी तणावपूर्ण शांतता कायम आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राज्य राखीव दलाच्या तुकड्यांसह आजूबाजूच्या तालुक्यातील पोलीस बळ या ठिकाणी बंदोबस्तासाठी मागवण्यात आला आहे. आज पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी पोलीस प्रशासन घेतांना दिसतंय.