मुंबईकरांनो, आरोग्य सांभाळा; मुंबईतील या भागात हवेची गुणवत्ता ढासळली अन् आजार वाढले

मुंबईकरांनो, आरोग्य सांभाळा; मुंबईतील या भागात हवेची गुणवत्ता ढासळली अन् आजार वाढले

| Updated on: Feb 03, 2023 | 10:22 AM

मुंबईतील माझगाव या भागातील हवा अतिशय खराब, या बिघडलेल्या हवेमुळे मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात श्वसनाच्या आजारांची समस्या

मुंबई : गेला संपूर्ण जानेवारी महिना मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळ्याची नोंद करण्यात आली होती. सातत्याने ढासळत असलेल्या हवेच्या गुणवत्तेमुळे याचा थेट परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर होताना दिसतोय. या बिघडलेल्या हवेमुळे मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात श्वसनाच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. मुंबईतील माझगाव या भागातील हवा अतिशय खराब अशी नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना हवेची गुणवत्ता ढासळल्याने श्वसनाचे आजार भेडसावू लागले आहेत. ही गंभीर बाब असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची नोंद घेतली असून उद्या मुंबई महानगरपालिकेच्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात मुंबई महापालिकेने मुंबईत एअर प्युरीफिकेशन टॉवर उभारण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्यामुळे उद्याच्या सादर होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात या नव्या प्रकल्पाची नोंद होते का, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

Published on: Feb 03, 2023 10:22 AM