पुणेकरांनो...काळजी घ्या, मुंबईपेक्षा पुण्याची हवा प्रदूषित; आरोग्य विभागाचं आवाहन काय?

पुणेकरांनो…काळजी घ्या, मुंबईपेक्षा पुण्याची हवा प्रदूषित; आरोग्य विभागाचं आवाहन काय?

| Updated on: Nov 07, 2023 | 6:21 PM

वातावरणात झालेल्या बदलामुळे मुंबईतील हवा प्रदूषित पाहायला मिळतेय. मात्र आता मुंबई पाठोपाठ पुण्यातील हवेची गुणवत्ता ढासळली आहे. राज्याचा वायू गुणवत्ता निर्देशांक २०० च्या वर गेला असून मुंबई, पुणे या शहरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे समोर आले आहे.

पुणे, ७ नोव्हेंबर २०२३ | वातावरणात झालेल्या बदलामुळे मुंबईतील हवा प्रदूषित पाहायला मिळतेय. मात्र आता मुंबई पाठोपाठ पुण्यातील हवेची गुणवत्ता ढासळली असल्याचे समोर आले आहे. सकाळपासूनच पुण्यातील हवेत मोठ्या प्रमाणात धुलीकण दिसत आहे. या हवेतील धुलीकणामुळे पुण्यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण दिसून येत आहे. राज्याचा वायू गुणवत्ता निर्देशांक २०० च्या वर गेला असून मुंबई, पुणे या शहरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे समोर आले आहे. हवेची गुणवत्ता ढासळल्याने श्वसनविकारच्या आजारात वाढ झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना रुमाल किवा तोंडाला मास्क वापरण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. राज्याचे आरोग्य संचालकांनी राज्यातील जिल्हा शल्य चिकित्सकांची बैठक घेतली आहे. या बैठकीत नागरिकांना आवाहन करण्याच्या सूचना करण्यात आला. लहान मुलं आणि गरोदर महिलांनी काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

Published on: Nov 07, 2023 06:21 PM