‘जरांगेंमध्ये हिंमत नव्हती माझ्यात आहे, मला गोळ्या…’, अजय बारस्करांचा फडणवीसांच्या सागर बंगल्याबाहेर ठिय्या, मागणी काय?
मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण द्या, मराठवाड्यातील मराठ्यांचे कल्याण करा, त्यांचे प्रश्न सोडवा, अशी मागणी घेऊन अजय बारस्कर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय बंगल्यासमोर ठिय्या मांडला आहे. याबद्दल बोलताना बारस्कर म्हणाले, अशी मागणी करण्यामागे एकच कारण....
मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण द्या, मराठवाड्यातील मराठ्यांचे कल्याण करा, त्यांचे प्रश्न सोडवा, अशी मागणी घेऊन अजय बारस्कर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय बंगल्यासमोर ठिय्या मांडला आहे. याबद्दल बोलताना बारस्कर म्हणाले, अशी मागणी करण्यामागे एकच कारण आहे ते म्हणजे जरांगे म्हणाले होते, सागर बंगल्यासमोर जाऊन बसणार… ते नाही बसले मग मी येऊन बसलो. माझ्यावर त्यांनी शिक्का मारला मी फडणवीसांचा माणूस आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यात हिंमत नसेल पण माझ्यात हिंमत आहे. म्हणून मी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला सागर बंगल्यावर आलो… असे म्हणत अजय बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटलांवर हल्लाबोल केला. इतकंच नाहीतर काय गोळ्या घालायच्या त्या घाला, असंही अजय बारस्कर यांनी म्हटलं. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचं कारण म्हणजे सरकारच आरक्षण देऊ शकतं… आरक्षण हे मारूतीच्या मंदिरात मिळत नाही, असं म्हणत बारस्करांनी म्हटलंय.