Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajay Gujar | आम्ही संप पुकारला होता , तो आज झालेल्या बैठकी नंतर आम्ही मागे घेत आहोत - अजय गुजर

Ajay Gujar | आम्ही संप पुकारला होता , तो आज झालेल्या बैठकी नंतर आम्ही मागे घेत आहोत – अजय गुजर

| Updated on: Dec 20, 2021 | 10:33 PM

राज्यात मागील 54 दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचारी आंदोलनात (ST Workers Strike) आता उभी फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर (Ajaykumar Gujar) यांनी एसटी संपातून माघार घेतली आहे.

मुंबई : राज्यात मागील 54 दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचारी आंदोलनात (ST Workers Strike) आता उभी फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर (Ajaykumar Gujar) यांनी एसटी संपातून माघार घेतली आहे. आज परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) आणि अजयकुमार गुजर यांच्यात प्रदिर्घ चर्चा झाली. त्यानंतर अजयकुमार गुजर यांनी आपण संप मागे घेतल्याचं जाहीर केलं.

‘आम्ही संप पुकारला होता. तो आज झालेल्या बैठकीनंतर आम्ही मागे घेत आहोत. एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाचा लढा न्यायालयावर सोपवलेला आहे. न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य असेल. राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की, सर्व कर्मचाऱ्यांनी आपण पुकारलेला लढा चर्चा केल्याप्रमाणे आता थांबवत आहोत. 22 डिसेंबरपर्यंत तुम्ही कामावर हजर व्हा. आपल्यावरील कारवाई मागे घेण्याची विनंती आम्ही केली आहे’, असं अजय गुजर यांनी सांगितलं. दरम्यान, अजय गुजर यांची ही घोषणा महत्वाची आहे. कारण, अजय गुजर प्रणित महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेनं ही संपाची नोटीस दिली होती.

Published on: Dec 20, 2021 10:33 PM