अधिकारी समोर अन् हा लोळतो, आईवरून शिव्या देतो.. अजय बारसकर यांचे जरांगेंवर सनसनाटी आरोप
जरांगेंनी संत तुकाराम महाराज यांचा अपमान केला त्यामुळे आता जरांगेंचे १०० पाप भरलेत, अशी टीका अजय बारसकर महाराज यांनी केलीये. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी तुकोबारायांची माफी मागितली तर गुप्त बैठकांवरून त्यांनी गंभीर आरोप केलेत
मुंबई, २२ फेब्रुवारी २०२४ : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावरती त्यांच्यात आंदोलनातील सहकाऱ्यानं सनसनाटी आरोप केलेत. जरांगेंनी संत तुकाराम महाराज यांचा अपमान केला त्यामुळे आता जरांगेंचे १०० पाप भरलेत, अशी टीका अजय बारसकर महाराज यांनी केलीये. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी तुकोबारायांची माफी मागितली तर गुप्त बैठकांवरून त्यांनी गंभीर आरोप केलेत. संत फंत म्हणत संत तुकाराम महाराज यांचा जरांगेंनी अपमान केलाय. त्यामुळे जरांगेंची १०० अपराध भरले अशी टीका बारसकर महाराजांनी केली. तर उपोषणाच्या चिडचिडीतून चुकून शब्द निघाले म्हणत त्यांनी तुकोबारायांची माफी मागितली. उपोषणादरम्यान जरांगेंची तब्येत बिघडली होती. त्यावेळी पाणी पिण्याची विनंती केली. पण मी मोठा होईल या अहंकारातून त्यांनी पाणी घेतलं नाही असा आरोपही त्यांनी केला. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट