आईचा उल्लेख अन् अजित पवार भावूक; कंठ दाटला, म्हणाले, ‘आईनं सांगितलं होतं, माझ्या दादाविरोधात….’
बारामती विधानसभेचा अर्ज भरल्यानंतर अजित पवार काहिसे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. आपल्या आईने माझ्या दादाविरोधात उमेदवार देऊ नका, असं सांगितलं होतं. असं म्हणत घरफोडीच्या मुद्द्यावरून थेट शरद पवारांनाच प्रश्न करण्यात आला.
लोकांना घर फुटलेलं आवडत नाही, म्हणून लोकसभेला घरातील उमेदवार द्यायला नको होतो, अशी कबुली देणाऱ्या अजित पवारांनी शरद पवारांवरच आपलं घर फोडण्याचा आरोप केला. यावेळी बोलताना अजित पवार भावूक झाले होते. शरद पवार यांचे भाऊ आप्पासाहेब पवार आणि तिसरे भाऊ अनंतराव पवार त्यांचं टोपणनाव (तात्यासाहेब) असं होतं. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे. आप्पासाहेब यांचा परिवार म्हणजे राजेंद्र पवार आणि रोहित पवार तर अंनतराव पवार यांचे पुत्र अजित पवार आणि श्रीनिवास पवार तर श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार… लोकसभेला अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात लढत झाली होती. याघडीला अजित पवार यांना वगळता सर्व मंडळी शरद पवारांकडे आहेत. मात्र विधानसभेला आपल्या सख्या पुतण्याला उमेदवारी देऊन शरद पवारांनी तात्यासाहेबांचं म्हणजे आपलं घर फोडलं का? असा सवाल अजित पवारांनी शरद पवारांना थेट केला आहे. बघा नेमकं काय म्हणाले अजित पवार?