मुंडेंच्या भेटीनंतर दादा अन् मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढल्यानंतर हालचालींना वेग
धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यात झालेल्या तासभर भेटीनंतर मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढल्यानंतर आता अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली.
बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून होत आहे. या राजीनाम्याच्या दबावादरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची तडकाफडकी भेट घेतली. मंत्री धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्यात काही वेळ चर्चा झाली. बीडमधील हत्येनंतर विरोधकांच्या राजीनाम्याच्या मागणीवरही चर्चा झाली. दादांनी परळीतील राजकीय परिस्थितीचाही आढावा घेतला. बीडचं पालकमंत्रिपद राष्ट्रवादीकडे आलंय. त्यावरून काय करायचं, याचीही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यात झालेल्या तासभर भेटीनंतर मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढल्यानंतर आता अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली. यांच्यात साधारण अर्धातास चर्चा झाली. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीपूर्वी धनंजय मुंडे आणि अजित पवारांची बैठक झाली. या बैठकीत राजीनाम्याच्या वाढत्या दबावावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर जोपर्यंत पुरवा नाही, तोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा नाही, असं अजित पवार यांचं मत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.