मैत्री, नातं-गोतं, भावकी बाजूला ठेवा… मी ऐकून घेणार नाही; अजित दादांचं कार्यकर्त्यांना आवाहन काय?
'विरोधी उमेदवाराला प्रचारादरम्यान भेटायला जाऊ नका. परत म्हणाल दादा फक्त गप्पा मारायला गेलो होतो. मी तसलं काही ऐकून घेणार नाही. आपली महायुती आहे, महायुतीचा धर्म पाळायला हवा. मैत्री, नातं-गोतं, भावकी-रावकी बाजूला ठेवा. ही निवडणूक देशाची आहे.', अजित पवार यांचं कार्यकर्त्यांना आवाहन
विरोधी उमेदवाराला प्रचारादरम्यान भेटायला जाऊ नका, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय. मी ऐकून घेणार नाही, महायुतीचा धर्म पाळा, मैत्री, नातं-गोतं, भावकी-रावकी बाजूला ठेवा, असं म्हणत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना खडसावत आवाहन केलं आहे. विकासाची वज्रमुठ बांधून आपल्याला नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं आहे. ही निवडणूक विचारांची नाही तर विकासाची असल्याचे अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितलंय. ‘विरोधी उमेदवाराला प्रचारादरम्यान भेटायला जाऊ नका. परत म्हणाल दादा फक्त गप्पा मारायला गेलो होतो. मी तसलं काही ऐकून घेणार नाही. आपली महायुती आहे, महायुतीचा धर्म पाळायला हवा. मैत्री, नातं-गोतं, भावकी-रावकी बाजूला ठेवा. ही निवडणूक देशाची आहे.’, असं आवाहन अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं. यावेळी देशातील आजवर झालेल्या पंतप्रधानाच्या काळात घटना दुरुस्ती किती वेळा झाली, याचा लेखाजोखा अजित पवारांनी मांडला. मात्र विरोधक फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळातील घटना दुरुस्तीवर भाष्य करतात. विरोधकांकडून नको ते मुद्दे उचलले जातायेत. त्याला काही अर्थ नसल्याचे म्हणत अजित पवार यांनी हल्लाबोल केलाय.