अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात केली सडकून टीका

अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची….सख्खा भाऊ दादांच्या विरोधात केली सडकून टीका

| Updated on: Mar 18, 2024 | 6:59 PM

अजित पवार हा नालायक माणूस आहे तर ते वयस्कर माणसाची किंमत करत नाही, असं वक्तव्य श्रीनिवास पवार बारामतीतील काटेवाडीत बोलताना केलं. अजित पवार यांनी घेतलेली भूमिका पटली नाही, असे मत श्रीनिवास पवार यांनी व्यक्त केलं.

मुंबई, १८ मार्च २०२४ : सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्या विरोधात भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. अजित पवार हा नालायक माणूस आहे तर ते वयस्कर माणसाची किंमत करत नाही, असं वक्तव्य श्रीनिवास पवार बारामतीतील काटेवाडीत बोलताना केलं. अजित पवार यांनी घेतलेली भूमिका पटली नाही, असे मत श्रीनिवास पवार यांनी व्यक्त केलं. ‘अजित पवार यांच्या चांगल्या वाईट काळात मी त्यांच्या सोबत राहिलो नेहमी साथ दिली. पण अजित पवार यांच्या सारखा नालायक माणूस कुणी नाही…ज्यांना कुणाला पदं मिळाली ती शरद पवार यांच्यामुळे मिळाली आणि त्यांच माणसाला म्हणायचं आता तुम्ही घरी बसा, किर्तन करा…औषध असतात त्याप्रमाणे काही नात्यांचीही एक्स्पायरी डेट असते. शरद पवार यांनी २५ वर्ष मंत्री केलं. आता त्यांना म्हणतात किर्तन करा’, असे म्हणत अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.

Published on: Mar 18, 2024 06:59 PM