अजित पवारांचा शरद पवार गटाच्या विजयी उमेदवाराला थेट फोन अन्... दादा नेमकं काय म्हणाले?

अजित पवारांचा शरद पवार गटाच्या विजयी उमेदवाराला थेट फोन अन्… दादा नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Nov 24, 2024 | 7:42 PM

मोहोळ विधानसभेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने यांचा पराभव झाला. अजित पवार गटाचे दिग्गज नेते राजन पाटील यांचे विरोधक असलेले उमेश पाटील यांच्यामुळे राजू खरे यांच्या विजय झाल्याचे मानले जाते. त्याच उमेश पाटील यांना अजित पवारांनी फोन केल्याची चर्चा आहे.

अजित पवार यांनी उमेश पाटील आणि शरद पवार गटाचे विजयी उमेदवार राजू खरे यांना अभिनंदन केल्याचा फोन आल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते उमेश पाटील यांनी ही माहिती दिली आहे. मोहोळ विधानसभेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने यांचा पराभव झाला. अजित पवार गटाचे दिग्गज नेते राजन पाटील यांचे विरोधक असलेले उमेश पाटील यांच्यामुळे राजू खरे यांच्या विजय झाल्याचे मानले जाते. त्याच उमेश पाटील यांना अजित पवारांनी फोन केल्याची चर्चा आहे. राजन पाटील यांची जुलमी, दडपशाही, हुकूमशाही वृत्तीला आमचा विरोध होता तो मतात रूपांतरीत केला. अजित पवारांनी मला फोन करून माझे आणि आमचे उमेदवार राजू खरे यांचे अभिनंदन केलं आहे, असं उमेश पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, महायुतीला २३० जागांवर दणदणीत विजय मिळाला आहे. यामध्ये भाजप १३२ जागा, शिवसेना शिंदे गट ५७ आणि राष्ट्रवादी अजित पवार गट ४१ जागांवर आघाडीवर आहेत. मोहोळ विधानसभेची जागा मात्र अजित पवार यांना जिंकता आलेली नाही. तिथे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराचा विजय झाला आहे.

Published on: Nov 24, 2024 07:42 PM