Ajit Pawar : ‘नका आणू शाली, हार… मला टोप्या नका घालू, नुसता प्रेमाचा नमस्कार…’, बीडमध्ये दादांचं मिश्कील वक्तव्य
उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत. बीडमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना खडसावले
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह प्रवक्त्यांनी मोलाचा सल्ला दिला. ‘सगळ्यांनीच तोलून मापून बोललं पाहिजे.कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही. चुकीचं वागणाऱ्यांना मी वाचवणार नाही, असं अजित पवार म्हणाले. यासह होणारे सत्कार सोहळे, स्वागत आणि अस्वच्छतेवर देखील अजित पवार यांनी भाष्य केले आहे. ‘कुठे काहीतरी खायचं आणि त्याचा कचरा तिथेच टाकायचं. सत्काराला ज्या शाली देतात त्यातील कागद तसाच खाली… हार आणला की पिशवी खाली.. मी ती पिशवी उचलतो… मला बघितलं की राहुद्या दादा… नका आणू शाली, टोप्या घालू नका, हार घालू नका नुसता नमस्कार मला प्रेमाचा वाटेल’, असं म्हणत अजित पवार यांनी मिश्कील वक्तव्य केलं. पुढे दादा असेही म्हणाले, जेवढा मोठा हार तेवढी भिती वाटते. त्यामुळे त्या हाराचा बोजा वाटतो. आई-बापाच्या आणि चुलत्याच्या कृपेने चांगलं चालंलय आमचं…, असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवार यांचं नाव न घेतला खोचक टोलाही लगावल्याचे पाहायला मिळाले.

ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी

हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात

पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती

प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीची आत्महत्या, जालना भोकरदनमध्ये घडलं काय?
