Ladki Bahin Yojana : महिलांना 2100 रूपये मिळणार? ‘लाडकी बहिण’वर अजित पवार स्पष्टच म्हणाले, ‘सरकारने ठरवलं तर…’
महायुतीच्या प्रचाराची पहिली प्रचारसभा कोल्हापुरात पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महायुतीच्या जाहीरनाम्यातील १० महत्त्वाच्या घोषणा जाहीर केल्यात. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा महायुतीचं सरकार आल्यावर लाडक्या बहिणींना १५०० रूपयांवरून २१०० रूपये देणार असल्याचा वायदा केलाय. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे.
आज अजित पवारांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांना लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या 2100 रूपयांसंदर्भात आणि मविआ महिलांना देणार असलेल्या 3000 रूपयांसंदर्भात सवाल करण्यात आला. अजित पवार म्हणाले, मी विरोधकांचा जाहीरनामा पाहिला. मी अतिशय प्रांजळपणे आणि गंभीरपणे महाराष्ट्राला सांगतो, ही महाराष्ट्राची फसवेगिरी आहे. हा महाराष्ट्राला संभ्रमात टाकण्याचा डाव आहे. 3 हजार रुपये देणार. त्याबाबतीत आकडा जातो 90 हजार कोटी. थोडी संख्या वाढली तर 1 लाख कोटी रुपये तर इकडेच गेले. त्यांनी सुशिक्षितांकरता 4000 रुपये सांगितले, सुशिक्षित 1 कोटी म्हणटले तर ते 40 हजार कोटी ते झाले. ते झाल्यानंतर अजून काही माफी ती माफी अमूकतमूक काढली तर त्याला 50 हजार कोटी लागतील. सर्व त्यांच्या योजनांचा आकडा काढला तर हे कदापि शक्य नाही. ह्यांच्या हातात काहीच नाही. त्यांचं केंद्रात सरकार असतं तर केंद्राने कबूल केलं आहे, असं सांगू शकले असते. तुम्हाला लिमिटच्या बाहेर कर्जाला परवानगीच नाही. राज्याचा कारभार करत असताना आपण सगळ्यांनी आजपर्यंत आर्थिक शिस्त पाळण्याचा मनापासून प्रयत्न केला. एकनाथ शिंदे यांनी 600 रुपये वाढवण्याचं सांगितलं आहे. उद्या आम्ही केंद्र सरकारसोबत चर्चा करुन मदतीचं आवाहन करु शकतो. कारण केंद्राचं सरकार आमचं आहे. केंद्राने ठरवलं ते करु शकतो, असं अजित पवार म्हणाले.
![साळवींनंतर संजय दिना पाटीलही शिवसेनेत? चर्चांवर स्पष्टच म्हणाले... साळवींनंतर संजय दिना पाटीलही शिवसेनेत? चर्चांवर स्पष्टच म्हणाले...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/sanjay-dina.jpg?w=280&ar=16:9)
साळवींनंतर संजय दिना पाटीलही शिवसेनेत? चर्चांवर स्पष्टच म्हणाले...
![करुणा शर्मांचे दादांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, 'अजित पवार मुंडेंना...' करुणा शर्मांचे दादांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, 'अजित पवार मुंडेंना...'](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-68.jpg?w=280&ar=16:9)
करुणा शर्मांचे दादांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, 'अजित पवार मुंडेंना...'
![बाळासाहेबांनी गौरवलेला रत्नागिरीतील शिवसैनिक, कोण आहेत राजन साळवी? बाळासाहेबांनी गौरवलेला रत्नागिरीतील शिवसैनिक, कोण आहेत राजन साळवी?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/shivsena-2.jpg?w=280&ar=16:9)
बाळासाहेबांनी गौरवलेला रत्नागिरीतील शिवसैनिक, कोण आहेत राजन साळवी?
!['शरद पवार राजकारण विद्यापीठाचे कुलगुरू तर राऊत...', शहाजीबापूंची टीका 'शरद पवार राजकारण विद्यापीठाचे कुलगुरू तर राऊत...', शहाजीबापूंची टीका](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/shahaji-bapu-patil-.jpg?w=280&ar=16:9)
'शरद पवार राजकारण विद्यापीठाचे कुलगुरू तर राऊत...', शहाजीबापूंची टीका
!['अरे चल... फालतू', स्नेहभोजनाला जाण्यावरून सवाल, ठाकरेंचा खासदार भडकला 'अरे चल... फालतू', स्नेहभोजनाला जाण्यावरून सवाल, ठाकरेंचा खासदार भडकला](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/sanjay-jadhav-.jpg?w=280&ar=16:9)