दादागिरीऐवजी गांधीगिरी? अजित पवारांची नवी स्टॅटेजी? दादा म्हणाले, माझी चूक झाली...

दादागिरीऐवजी गांधीगिरी? अजित पवारांची नवी स्टॅटेजी? दादा म्हणाले, माझी चूक झाली…

| Updated on: Aug 14, 2024 | 10:25 AM

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून दोन महिने झालेत. आता विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर येईन ठेपले आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी कबुली दिली आहे.लोकसभा निवडणुकीत बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवणं मोठी चूक होती, अशी खंत दादांनी व्यक्त केली.

बारामतीत बहीण सुप्रिया सुळेंविरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीसाठी उभं करणं ही चूक होती तर घरात राजकारण आणायला नको होतं, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुप्रिया सुळे यांच्यावर हल्लाबोल करणाऱ्या अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी कबुली दिली आहे. प्रचारादरम्यान पवार कुटुंबीयांनी आपल्याला एकटं पाडल्याचा आरोप करणाऱ्या दादांनी आता मात्र आपण घरात राजकारण आणायला नको हवं होतं, अशी खंत व्यक्त केली आहे. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीच्या वेळी अजित पवार म्हणाले, बहीण सुप्रिया सुळेंविरोधात नणंद सुनेत्रा पवार यांना उभं करायला नको होतं. पण त्यावेळी उभं केलं गेलं. पार्लमेंट्री बोर्डाने निर्णय घेतला, परंतू आता एकदा बाण सुटल्यावर आपण काहीच करू शकत नाही, पण आज माझं मन मला सांगतं, तसं व्हायला नको होतं

Published on: Aug 14, 2024 10:25 AM