Pune | पुण्यातील निर्बध शिथिलतेवर आज निर्णय? अजितदादांची कोरोना आढावा बैठक सुरु
पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक होणार, आजच्या बैठकीत शहरातील निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय होणार आहे. व्यापाऱ्यांना दुकानांची वेळ वाढून देण्याचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक होणार, आजच्या बैठकीत शहरातील निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय होणार आहे. व्यापाऱ्यांना दुकानांची वेळ वाढून देण्याचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवांची दुकाने आता सकाळी 7 ते दुपारी 2 यावेळेपर्यंत उघडी ठेवण्याबरोबरच आणखी काही सेवांना सवलत मिळण्याची शक्यता आहे. पुणे महापालिका ह्ददीतील कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर 10 टक्क्यांपेक्षा कमी असल्याने त्यानुसार हे निर्बध कमी होणार आहेत. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटीचा गेल्या आठवड्यातील दर 10 टक्क्यांपेक्षा कमी आणी एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील त्याठिकाणीचे निर्बध कमी करण्याचा निर्णय, या निर्णयाचा फायदा पुणे शहराला मिळणार आहे.
Latest Videos