राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर, अजित पवारांची घोषणा
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये या तारखेची घोषणा केली आहे. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरला होणार आहे.
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये या तारखेची घोषणा केली आहे. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरला होणार आहे. त्यापूर्वी कामकाज पूर्ण करुन घ्या, असे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत. हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली असली तरी अधिवेशन नेमकं कुठं होणार यासदंर्भात संभ्रम कायम आहे. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन प्रथेप्रमाणं नागपूरला घेतलं जातं. मात्र, गेल्यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाचं कारण देत मुंबईला घेण्यात आलं होतं. विरोधी भाजपकडून राज्य सरकारवर टीका केली होती. यावेळी अधिवेशन कुठं होणार याकडं आता लक्ष लागलं आहे.
Latest Videos