शरद पवार यांना धमकी! मास्टरमाइंड कोण? बंदोबस्त करा; अजित पवार भडकले
अनेक नेत्यांनी यावरून सरकारवर टीका केली आहे. तर अनेकांनी आपली प्रतिक्रिया देताना हे प्रकरण सांभाळण्यास सरकार सक्षम असल्याचे म्हटलं आहे. तर यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत तपासाची मागणी केली आहे. तर शरद पवार यांना काही झाल्यास त्याला राज्याचे आणि देशाचे गृहखाते जबाबदार असा इशारा दिला आहे.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावरून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तर अनेक नेत्यांनी यावरून सरकारवर टीका केली आहे. तर अनेकांनी आपली प्रतिक्रिया देताना हे प्रकरण सांभाळण्यास सरकार सक्षम असल्याचे म्हटलं आहे. तर यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत तपासाची मागणी केली आहे. तर शरद पवार यांना काही झाल्यास त्याला राज्याचे आणि देशाचे गृहखाते जबाबदार असा इशारा दिला आहे. त्यानंतर आता यावरून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सरकारकडे मागणी केली आहे. त्यांनी, धमकी देणाऱ्या सौरभ पिंपळकरचा मास्टरमाइंड कोण याचा तपास करावा अशी मागणी केली आहे. तसेच तो खरंच भाजपचा कार्यकर्ता आहे की नाही हे आपल्याला माहित नाही. पण तसा उल्लेख आहे. त्यांच्या पक्षाने तसं बोलायला सांगितलंय का? असा प्रश्न राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विचारला.