Ajit Pawar : उपमुख्यमंत्र्यांचा आकडा चुकीचा, आमच्या सरकारमध्ये 7 लोकांनी सुरुवातीला शपथ घेतली, अजित पवारांचा पलटवार
मुंबईचाही व्याप पाहावा लागतो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा राज्यावर कोणतंही संकट नव्हतं. निवडणुका झालेल्या. त्यानंतर सरकार आलं. त्यामुळे त्या काळात काही अडचण नव्हती, असं अजितदादा म्हणाले.
नागपूर : अजित पवार (Ajit Pawar) हे नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. मुख्यमंत्री (CM) आणि उपमुख्यमंत्रीच कारभार पाहत आहेत. जोडीला कुणाला घेत नाही असं सांगितलं तर उपमुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) काल काही तरी स्टेटमेंट केलं. त्यांनी आमच्या सरकारमध्ये पाच मंत्री असल्याचं सांगितलं. त्यांचा आकडा चुकीचा आहे. सात लोकांनी सुरुवातीला शपथ घेतली होती. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, जयंत पाटील, नितीन राऊत, यांनी शपथ घेतली होती. यातील काहीतर मुख्यमंत्रीपद भूषवू शकतील अशी माणसे होती. त्या सातजणांमध्ये एकनाथ शिंदेही होते. जयंत पाटील ताकदीचे नेते आहेत. भुजबळ ताकदीचे नेते आहेत. मला राजकारणात 25 वर्ष झाली. बाळासाहेब थोरात तर 8 टर्मचे आमदार आहेत. एवढे सीनियर नेते आहेत. तसं यांच्यात दोघेच आहे. त्यांना मुंबईचाही व्याप पाहावा लागतो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा राज्यावर कोणतंही संकट नव्हतं. निवडणुका झालेल्या होत्या. त्यानंतर सरकार आलं होतं. त्यामुळे त्या काळात काही अडचण नव्हती, असं अजितदादा म्हणाले.