जर सेल्फी नाही दिला तर लोकं म्हणतात लै ताटला, अजित पवार यांची टोलेबाजी
जर आम्ही 10 वाजता गेलो तर लोकं बाजूला करण्यात वेळ जातो. लोक येतात आणि म्हणतात दादा सेल्फी जर नाही दिला तर लोकं म्हणतात लै ताटला आता उपमुख्यमंत्री झाला म्हणून, त्यापेक्षा पहाटे उठून काम केली तर लोकं नसतात
आम्ही सकाळी लवकर उठून काम करतो.. काही वेळा अधिकाऱ्यांना त्रास होतो.. जर आम्ही 10 वाजता गेलो तर लोकं बाजूला करण्यात वेळ जातो. लोक येतात आणि म्हणतात दादा सेल्फी जर नाही दिला तर लोकं म्हणतात लै ताटला आता उपमुख्यमंत्री झाला म्हणून, त्यापेक्षा पहाटे उठून काम केली तर लोकं नसतात. त्यामुळं कामेही पटापट होत असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. बारामती तालुक्यातील एका पतसंस्थेच्या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.. त्यावेळी त्यांनी भल्या पहाटे कामांची सुरुवात का करतो याबद्दल सांगत उपस्थितांमध्ये हशा पिकवला..
Latest Videos