‘भाकरी फिरवली आता पक्षात पद द्या, यातून मुक्त करा’; अजित पवार यांची पवार यांच्याकडे कोणती मागणी?
तसेच त्यांनी थेट आपल्याला आता या जबाबदारीतून मुक्तच करा असे शरद पवार यांच्याकडे मागणी केली. त्यामुळे अनेकांना हा अनपेक्षीत धक्काच बसला. अजित पवार यांनी आपण गेल्या 1 वर्षापासून विरोधी पक्षनेतेपदावर काम केलं पण काही लोक अजूनही तू चांगलं काम कर असं म्हणातायत.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त बुधवारी मुंबई कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी अजित पवार यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. तसेच त्यांनी थेट आपल्याला आता या जबाबदारीतून मुक्तच करा असे शरद पवार यांच्याकडे मागणी केली. त्यामुळे अनेकांना हा अनपेक्षीत धक्काच बसला. अजित पवार यांनी आपण गेल्या 1 वर्षापासून विरोधी पक्षनेतेपदावर काम केलं पण काही लोक अजूनही तू चांगलं काम कर असं म्हणातायत. मग काय आता सत्ताधाऱ्यांचे कॉलर धरू का असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला. तसेच त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा अशी इच्छा व्यक्त केली. त्याचबरोबर त्यांनी, विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याची आपली इच्छा नव्हती. पण, आमदारांचा आग्रह आणि पक्षाने सांगितल्याने आपण ते घेतलं. पण आता यातून मुक्त करा. पक्ष संघटनेत कोणतीही जबाबदारी द्या. बघा कसा रिझल्ट आणतो असेही ते म्हणाले. सध्या यावरून उलटसुलट चर्चा होताना दिसत असून खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार प्रफुल पटेल यांना कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानेच ते अशी मागणी करत आहेत. तर त्यांना आता राज्याचे प्रदेशाध्यक्ष पद हवं असल्याची चर्चा रंगू लागली आहे.